वेश्याव्यवसाय करणा-या १६ नायजेरीयन तरुणींना अटक; मसाज पार्लर संशयाच्या भोवऱ्यात

रमेश मोरे
Wednesday, 3 February 2021

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या भागात वेश्याव्यवसाय करणा-या १६ नायजेरीयन तरुणींना सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात आली.

जुनी सांगवी - पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या भागात वेश्याव्यवसाय करणा-या १६ नायजेरीयन तरुणींना सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात आली.

मंगळवार ता.२ रात्री सामाजिक सुरक्षा पथकाकडून बनावट ग्राहकाद्वारे या रॅकेटवर सापळा रचून कारवाई करण्यात आली असल्याचे सामाजिक सुरक्षा पथकाकडून सांगण्यात आले. परिसरातील पिंपळे सौदागर येथे मसाज पार्लरच्या नावाखाली अशाच सेक्स रॅकेट बाबत पोलिसांनी कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच पिंपळे गुरव येथे हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरातील मसाज पार्लर संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात मसाज पार्लरची मोठी संख्या आहे.

पिंपळे गुरव रहिवाशी भागात सापळा रचून सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. यात चार तरुणी ग्राहकांना पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. यातील काही तरुणी कोंढवा परिसरातून येवून येथे व्यवसाय करत होत्या. ऑनलाईन ग्राहक शोधून हा व्यवसाय सुरू होता. अशी माहिती पथकाकडून देण्यात आली.

पिंपरीत उद्या सायंकाळी पाणीपुरवठा बंद

सामाजिक सुरक्षा विभागाने त्याठिकाणची संख्या पाहता सांगवी पोलिसांना सोबत घेवून मोरया पार्क भागात छापा टाकून कारवाई केली. रात्री उशीरापर्यंत सांगवी पोलिस ठाण्यात कारवाईचे काम सुरू होते. यात या नायजेरियन तरुणींचे पासपोर्ट तपासणी, त्यांची इतर राहण्याची ठिकाणे चौकशी करून तपासणी करण्यात येत होती. सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे व पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे पुन्हा भाडेकरार नसणे, पोलिस ठाण्यात भाडेकरुंची नोंद नसणे, ज्यादा रक्कम भाड्यापोटी मिळत असल्याने विना चौकशी विदेशी नागरीकांना घरे मिळणे ही गंभीर बाब समोर येत आहे. तर घरमालक एजंट लोकांवर प्रॉपर्टी मोकळी सोडून ईतरत्र राहातात. या कामात भाडेकरी मिळवून देण्यासाठी एजंट लोकांचाही आर्थिक फायदा होत असल्याने विदेशी नागरीकांना भाड्याची घरे मिळवून देण्यासाठी ही एजंट मंडळी सक्रीय असतात.

पिंपरी महापालिका पोटनिवडणूक; राज्य निवडणूक आयोगाचे तयारीचे आदेश

पिंपळे गुरव येथे वेश्याव्यवसाय करणा-या १६ तरुणींना सापळा रचून सामाजिक सुरक्षा पथकाकडून अटक करण्यात आली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 Nigerian youths arrested for prostitution Massage parlor suspicion