पिंपरी : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आढळले 177 जण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

शहरात सुरू असलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेत आतापर्यंत एक हजार 314 पथकांनी 13 लाख 53 हजार 886 जणांची तपासणी केली.

पिंपरी : शहरात सुरू असलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेत आतापर्यंत एक हजार 314 पथकांनी 13 लाख 53 हजार 886 जणांची तपासणी केली. त्यातील एक हजार 210 जणांच्या घशातील नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 177 जण पॉझिटिव्ह आढळले. 

पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा

आज 864 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 77 हजार 317 झाली आहे. आज 806 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 61 झाली आहे. सध्या सहा हजार 950 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 16 आणि शहराबाहेरील पाच, अशा 21 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या एक हजार 306 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 484 झाली आहे. 

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक आकुर्डी (पुरुष वय 60), चिंचवड (स्त्री वय 70, पुरुष वय 49 व 64), पुनावळे (स्त्री वय 52 व पुरुष वय 48), पिंपळे सौदागर (पुरुष वय 57), भोसरी (पुरुष वय 68), मोशी (पुरुष वय 30 व 57), काळेवाडी (स्त्री वय 74), पिंपळे गुरव (पुरुष वय 61), पिंपरी (पुरुष वय 70), सांगवी (पुरुष वय 72), विशालनगर (पुरुष वय 54) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक खराबवाडी (पुरुष वय 43), जुन्नर (पुरुष वय 58), खेड (स्त्री वय 60), महाड (पुरुष वय 44) आणि कोल्हापूर (पुरुष वय 74) येथील रहिवासी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 177 corona positive founds in my family, my responsibility campaign at pimpri chinchwad