corona.jpg
corona.jpg

पिंपरी चिंचवडमध्ये आज किती रुग्ण आढळले?, वाचा सविस्तर

पिंपरी : मंगळवारी मध्यरात्री बारापासून बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत संपलेल्या एकवीस तासांत पिंपरी चिंचवड शहरात 191 रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 3323 झाली आहे. आज 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1268 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 2008 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजपर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण, लिंबोरेवस्ती- दापोडी, लोंढे चाळ- पिंपरीगांव, सिध्दार्थनगर- दापोडी, पवारनगर- सांगवी, इंदिरानगर- चिंचवड, पवारवस्ती -दापोडी, घरकुल- चिखली, ममतास्वीट कॉर्नर -दिघी, काळभोरनगर -चिंचवड, अजंठानगर, महात्मा फुलेनगर- भोसरी, आकाशनगर- दिघी, पाटीलनगर -चिखली, कदम चाळ- खराळवाडी, विश्वशांती कॉलनी- पिंपळेसौदागर, मोहनगर -चिंचवड, विठ्ठलनगर- दापोडी, जोतीबानगर- काळेवाडी, सहयोगनगर -निगडी, संभाजीनगर, बजरंगनगर- खराळवाडी, किवळे, निगडी प्राधिकरण, गुळवेवस्ती -भोसरी, चिंचवडेनगर, दळवीचाळ- नेहरुनगर, शनिमंदिर वाय.सी.एम., महिंद्रा- पिंपरी, समर्थनगर -सांगवी, यमुनानगर- निगडी, गांधीनगर- पिंपरी, विठ्ठलनगर- भोसरी, दत्तनगर- चिंचवड, श्रध्दा गार्डन -काळेवाडी, संततुकारामनगर- पिंपरी, वडमुखवाडी,  भारतमातानगर- दिघी, आदित्यबिर्ला हॉस्पीटल, मिलिंदनगर -पिंपरी, वैभवनगर- पिंपरी, सेंट ऊर्सर्ला स्कुल- आकुर्डी, हॉलमार्क -रावेत, रहाटणी, च-होली, भोसरी, शाहूनगर -चिंचवड, त्रिवेनीनगर- तळवडे, सेक्टर २८- निगडी, चौधरीपार्क -दिघी, दळवीनगर- चिंचवड, एल.आय.सी.ऑफिस- आकुर्डी, गणेशनगर- बोपखेल, शिवतेजनगर -चिखली, केशवनगर- चिखली, विनोदेनगर- वाकड, बौध्दनगर -पिंपरी, रिव्हररोड -पिंपरी, मधुबन सोसायटी- पिंपरी, आकुर्डी, शितल रेसिडन्सी ‍-पिंपरी, वाकडकर वस्ती- वाकड, प्रेमलोक -चिंचवड, जवळकर बिल्डींग -कासारवाडी, भोईआळी -चिंचवड, लांडेवाडी- भोसरी, साईकुंज- कासारवाडी, तनिष्क -च-होली, शास्त्रीचौक- भोसरी, आनंदतरंग- च-होली, वैशालीनगर -पिंपरी, आदर्शनगर- दिघी, बापदेवनगर -देहूरोड, नढेनगर -काळेवाडी, आदर्शनगर- काळेवाडी, कृष्णानगर, ताम्हाणेवस्ती -चिखली, भिमशक्तीनगर, बौध्दनगर -निगडी, मोरेवस्ती -चिखली, राजीव गांधी वसाहत -नेहरुनगर, तुपेचाळ- दापोडी, नाटेकरचाळ- नेहरुनगर, गवळीमाथा, वाल्हेकरवाडी, शितळानगर -देहूरोड, पवनानगर- मावळ, बीड, इंदापूर, सिंहगडरोड, चाकण, नांदेड, बोपोडी, मामुर्डी येथील रहिवासी आहेत.

आज केशवनगर चिंचवड, प्रभातनगर पिंपळेगुरव, अजंठानगर, भाटनगर, हनुमान मंदिर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, आंबेडकर कॉलनी पिंपरी, समर्थनगर सांगवी, दत्तनगर वाकड, आनंदनगर चिंचवड, संत गजानन महाराज नगर दिघी, वडमुखवाडी, शास्त्रीचौक भोसरी, मोरयापार्क पिंपळेगुरव, सी.एम.ई.गेट दापोडी, इंदिरानगर चिंचवड, मुंजोबा वसाहत चिंचवड, ट्रफिक पोलीस ऑफिस भोसरी, डांगेचौक थेरगांव, महेंद्रा नेहरुनगर, श्रीनगर थेरगांव, सुखवाणी आकुर्डी, कोकणेनगर काळेवाडी, नक्षत्रम चिंचवड,शुभश्री आकुर्डी, रमाबाईनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, तापकिरमळा चौक काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोहननगर, विठ्ठलनगर नेहरुनगर, सुदर्शननगर पिंपळेगुरव, सिध्दार्थनगर दापोडी, साईचौक सांगवी, आदर्शनगर काळेवाडी, संततुकारामनगर भोसरी, यमुनानगर निगडी, सिध्दिविनायक कॉलनी रहाटणी, जगताप डेअरी पिंपळेनिलख, कैलासनगर थेरगांव, सुर्यदर्शन सोसायटी इंद्रायणीनगर, लक्ष्मीनगर पिंपळेगुरव, पवारवस्ती दापोडी, बिजलीनगर, निराधारनगर पिंपरी, मोरवाडी, तुळजाईकॉलनी थेरगांव, विठ्ठलमंदिर बोपखेल, नाशिकफाटा कासारवाडी, प्रेरणास्कुल थेरगांव, माळवाडी देहूगांव, रास्तापेठ, शिरुर येथील रहिवासी असलेले रूग्ण 'कोरोनामुक्त' झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com