पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 202 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 202 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख दोन हजार 900 झाली आहे. काल 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 98 हजार 199  झाली आहे. सध्या दोन हजार 871 सक्रिय रुग्ण आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 202 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख दोन हजार 900 झाली आहे. काल 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 98 हजार 199  झाली आहे. सध्या दोन हजार 871 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील दोन रुग्णाचा मृत्यू झाला. कालपर्यंत शहरातील एक हजार 830 आणि शहराबाहेरील 771 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल 1273 जणांना लस देण्यात आली. कालपर्यंत 17 हजार 798 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 909 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 962 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 340 घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील 907 जणांची तपासणी केली. 749 जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख 29 हजार 971 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

Video : मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात

काल एक हजार 277 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 777 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 1232 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालपर्यंत सहा लाख 46 हजार 476 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 42 हजार 345 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 41 हजार 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला

काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष पिंपरी (वय 70), भोसरी (वय 73)येथील रहिवासी आहेत. काल शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 202 New Corona Patients Found in Pimpri Chinchwad City