पिंपरी : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचा 'हा' नवा निर्णय!

पिंपरी : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचा 'हा' नवा निर्णय!

पिंपरी : शहरातील सुमारे 50 वीज देयके भरणा केंद्रांपैकी निम्मी म्हणजे 22 केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र, काही प्रतिबंधित भागांतील केंद्रे अद्याप बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीज भरणा सुविधेचाही वापर करावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. 

शहरात महावितरण कंपनीचे पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरातील वीज देयके भरणा केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. वीज देयके भरण्यासाठी कंपनीने ऑनलाईन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा वापर काही ग्राहकांनी केला. परंतु, असंख्य ग्राहकांनी अद्याप त्यांची देयके भरली नाहीत. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावे लागत होते. ग्राहकांची गैरसोय आणि स्वतःचे आर्थिक नुकसान हे लक्षात घेऊन महावितरण कंपनीने शहरातील जवळपास निम्मी वीज केंद्रे सुरु केली आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणच्या पिंपरी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विभागात एकूण सुमारे 18 केंद्रे असून, त्यापैकी सांगवी उपविभाग, पिंपरी, बिजलीनगर, सांगवी पीडब्ल्यूडी आणि खराळवाडी ही 5 केंद्रे सोमवार (ता.1) पासून सुरु करण्यात आली आहेत. तर भोसरी विभागामधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांतील विविध 17 केंद्रे चालू झाली आहेत. या विभागात एकूण 31 केंद्रे आहेत. सर्व केंद्रे त्यांच्या पूर्वीच्या वेळेत सुरु ठेवण्यात आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com