पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांसाठी २२ टन ऑक्सिजन

पिंपरी महापालिकेच्या जम्बो कोविड, ऑटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता.
Oxygen Cylinder
Oxygen CylinderSakal

पिंपरी - महापालिकेच्या जम्बो कोविड, ऑटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. मात्र, ऑक्सिजन संपला अशी परिस्थिती नव्हती. मंगळवारी रात्री आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार ऑक्सिजन समन्वयक अधिकारी उपायुक्त स्मिता झगडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्यामुळे रात्रीच तीन टँकरद्वारे सुमारे २२ टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिला.

सहानी, आयनॉक्स व एअर लिक्विड या कंपन्यांमार्फत ऑक्सिजन उपलब्ध करून घेतला आहे. सद्यःस्थितीत जम्बो कोविड, ऑटो क्‍लस्टर, गवळी माथा व इतर कोविड सेंटरला आवश्यक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून घेतला आहे. तसेच, वेळोवेळी असा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनासोबत समन्वय ठेऊन ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून घेण्याचे काम अविरत चालू आहे. खासगी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी आलेले सर्व फोन कॉल समन्वय अधिकारी व उपायुक्त स्मिता झगडे यांनी स्वीकारून संबंधित रुग्णालयांनाही ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्सिजन नाही म्हणून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही, अशी माहिती महापालिका प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी दिली.

Oxygen Cylinder
प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

ऑक्सिजन व्यवस्थापन समिती

ऑक्सिजन स्थितीचे नियोजन करण्यासाठी कार्यकारी अभियंता सतीश इंगळे व प्रमोद ओंभासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा समावेश असलेल्या ऑक्सिजन व्यवस्थापन समितीत उपअभियंता मोहन खोंद्रे, कनिष्ठ अभियंता संदीप पाडवी, अमोल धडस, दिग्विजय पवार, संभाजी गायकवाड, चंद्रकांत गुंडाळ, प्रवीण धुमाळ यांचा समावेश आहे. तसेच, जिल्हाधिकारी व अन्य सरकारी कार्यालयांशी समन्वय साधण्यासाठी उपअभियंता दीपक करपे व सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांची नियुक्ती आयुक्तांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com