esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये काल शनिवारी (ता. १०) २२८ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १०) २२८ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात शनिवारी २२८ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६० हजार ४५१ झाली आहे. काल २१० जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ५४ हजार ७९० झाली आहे. (228 New Corona Patients Found on Saturday in Pimpri Chinchwad)

सध्या एक हजार ३५७ सक्रिय रुग्ण आहेत. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला. कालपर्यंत शहरातील चार हजार ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. २८८ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

कालपर्यंत सात लाख ७४ हजार ११८ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ५३ मेजर व ४७७ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील ५५३ घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७७७ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image