पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस धक्कादायक; रुग्ण अन् मृतांची संख्या वाढली

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस धक्कादायक; रुग्ण अन् मृतांची संख्या वाढली

पिंपरी Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरासाठी आजचा शुक्रवार धक्कादायक ठरला. आज तब्बल सात जणांचा मृत्यू झाला. यातील सहा जण शहरातील असून, एक रुग्ण देहूरोड येथील रहिवासी आहे. यात दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. यातील सहा जण साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असून, एक जण 58 वर्षीय आहे. त्यामुळे पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी सायंकाळी सहापासून शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत  232 रुग्ण आढळले. तर 128 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 3789 झाली आहे. सध्या 1482 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 2295 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण मोहननगर चिंचवड (स्री, वय-६२ वर्षें), भीमनगर पिंपरी (स्त्री, वय- ६० वर्षे), चिंचवडेनगर चिंचवड (पुरुष, वय - ६५ वर्षे), रिव्हर रोड- पिंपरी (पुरुष, वय - ६७ वर्षे), साई नगर- मामुर्डी (पुरुष, वय-६६ वर्षे), निगडी (पुरुष, वय-८० वर्षे) व शितळानगर - देहूरोड (पुरुष , वय- ५८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com