मावळात आज दिवसभरात २७ नवे पॉझिटिव्ह, तर...

मावळात आज दिवसभरात २७ नवे पॉझिटिव्ह, तर...

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तळेगाव दाभाडे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील मृतांची संख्या २८ झाली असून, रुग्ण संख्या ८५६ वर पोचली आहे. तर ४३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

तळेगाव येथील ७९ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृतामध्ये समावेश आहे. मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २७ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक पाच, वडगाव व लोणावळा येथील प्रत्येकी चार, माळवाडी, टाकवे बुद्रुक व गहुंजे येथील प्रत्येकी दोन; तर तळेगाव दाभाडे (ग्रामीण ), कामशेत, वराळे, धामणे, सुदुंबरे, शिरगाव, जांभूळ व मळवली येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८५६ झाली आहे. त्यात शहरी भागातील ३९८ व ग्रामीण भागातील ४५८ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक २७४, लोणावळा येथे ७०, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ५४ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ४३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी १८ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३९६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २४० जण लक्षणे असलेले व १५६ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २४० जणांमध्ये १८७ जणांना सौम्य व ४३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. नऊ जण गंभीर, तर एक जण अत्यवस्थ आहे. सध्या २१२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, १८४ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com