मावळात दिवसभरात २९ पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

मावळ तालुक्यात सोमवारी २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात सोमवारी २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

तळेगाव स्टेशन येथील ७२ वर्षीय व ऊर्से येथील ७८ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १ हजार ४१५ तर मृतांची संख्या ५३ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यात कोरोना मुक्त होणारांचे प्रमाणही वाढत आहे. आत्तापर्यंत ६९ टक्के म्हणजेच ९८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २९ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १०, लोणावळा व कामशेत येथील प्रत्येकी चार, नायगाव येथील दोन तर वडगाव, माळवाडी, कुसगाव बुद्रुक, इंदोरी, देवले, काले, नाणे, मुंढावरे व औंढे खुर्द येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ४१५  झाली असून त्यात शहरी भागातील ७२० तर ग्रामीण भागातील ६९५   जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४६३, लोणावळा येथे १५१ तर वडगाव येथील रुग्ण संख्या १०६ झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ९८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी ४२ जणांना घरी सोडण्यात आले.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

तालुक्यात सध्या ३८१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २५२ जण लक्षणे असलेले तर १२९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २५२ जणांपैकी १७१ जणांमध्ये सौम्य तर ६५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ३८१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ.गुणेश बागडे यांनी दिली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 positive corona case and two death in maval taluka