पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापौर म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

"सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आरोग्य जपावे आणि आनंदी जीवन जगावे,'' असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. 

पिंपरी : "सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आरोग्य जपावे आणि आनंदी जीवन जगावे,'' असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. महापालिका सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना महापौर बोलत होत्या. सहायक आयुक्त मनोज लोणकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते. 

एकाच व्यासपीठावर राजकीय विरोधकांची मांदियाळी, कुठे घडला हा चमत्कार? वाचा

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनो! आता मास्क नसल्यास एक हजाराचा दंड 

नियत वयोमानानुसार मुख्याध्यापिका रोहिणी जोशी, उपलेखापाल राजेंद्र मेमाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जगदिश गायकवाड, मुख्य लिपिक सुनंदा तोडकर, दत्तात्रेय आंत्रे, नारायण कोडितकर, विलास बाणेकर, सिस्टर इन्चार्ज माणिक ढिलपे, वाहनचालक विलास थोरात, फार्मासिस्ट संजय तिवाटणे, उपशिक्षक कांता वाघमारे, सुनंदा कदम, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश धरत, वायरमन दत्तात्रय भोसले, फायरमन शिवाजी ताकवले, वायरलेस ऑपरेटर सुरेश पवार, वॉर्डबॉय रमेश आगळे, मजूर नरेश कांबळे, शिपाई पिराजी भोसले, हनुमंता पुंडा, सफाई कामगार लताबाई मागाडे, प्लंबर मनोजकुमार कांबळे, फायरमन शंकर पाटील सेवानिवृत्त झाले. 

मुख्याध्यापिका रत्नमाला आढाव, लॅब टेक्‍निशियन जयश्री काळे, सफाई कामगार सुजाता पंडित, मंगला पाटेळे, महेंद्र साकळे, कचरा कुली दाऊद मुंडे, मुरलीधर गाडे यांनी स्वच्छेनिवृत्ती घेतली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 officers and employees retired from pimpri chinchwad municipal corporation