पिंपरी-चिंचवडमध्ये आज ३३ जणांना संसर्ग, तर एवढ्या रुग्णांना सोडलंय घरी  

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ३३ जणांना संसर्ग, तर एवढ्या रुग्णांना सोडलंय घरी  

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 14) दिवसभरात ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर ३५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १ हजार १८७ झाली आहे. आज शहरातील दोन जणांचा मृत्यू झाला. एकूण मयतांची संख्या २१ झाली आहे. तसेच, शहराबाहेरील रहिवासी व पिंपरी-चिंचवड शहरात उपचार घेत असलेल्या १९ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज करोना बाधित ३३ रुग्ण आढळले. ते बौध्दनगर पिंपरी, चिंचवड, गणेशनगर थेरगाव, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, अजंठानगर, आनंदनगर चिंचवड, सिध्दार्थनगर दापोडी, पाटीलनगर चिखली, केशवनगर चिंचवड, तानाजीनगर चिंचवड, एश्वर्यनगर चिखली येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज नाणेकर चाळ पिंपरी येथील ४० वर्षीय महिला व  अजंठानगर- आकुर्डी येथील ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com