पिंपरी-चिंचवडमध्ये आज ३७२ नवीन रुग्ण; तर ५ जणांचा मृत्यू

पिंपरी शहरात बुधवारी ३७२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५१ हजार ५७ झाली आहे. आज २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
Corona Patients
Corona PatientsSakal

पिंपरी - शहरात बुधवारी ३७२ रुग्ण (Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५१ हजार ५७ झाली आहे. आज २७६ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४१ हजार ७८६ झाली आहे. (372 New Corona Patients in Pimpri Chinchwad)

सध्या पाच हजार १७१ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६८६ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४८५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

Corona Patients
पिंपरी : ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

आजपर्यंत पाच लाख ९२७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १३५ मेजर व एक हजार २१८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार १२७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सहा हजार ५२३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com