पिंपरी-चिंचवडमध्ये आज 535 नवे पॉझिटिव्ह, तर एवढ्या जणांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 535 नवे पॉझिटिव्ह, तर एवढ्या जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांत आज 557 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. त्यात शहरातील 535 आणि बाहेरील 22 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या 8171 झाली. मात्र, आजपर्यंत 4879 जण बरे झाले आहेत. आज 281 जणांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3163 जण उपचार घेत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत शहरातील 129 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील नऊ व बाहेरील दोन जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहराबाहेरील 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज मृत्यू झालेले रुग्ण थेरगाव (स्त्री, वय ३०), इंद्रायणीनगर भोसरी (पुरुष, वय ६९), कासारवाडी (पुरुष, वय ६४), घरकुल चिखली (स्त्री, वय ६५), चिंचवड (पुरुष, वय ४२), मोशी (स्त्री, वय ५३), नेहरूनगर (पुरुष, वय ५०), तळवडे (पुरुष, वय ५७), आनंदनगर चिंचवड (पुरुष, वय ४८), तळेगाव रोड (पुरुष, वय ५८), पुणे (पुरूष, वय ८०) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com