पिंपरी-चिंचवड शहरात 81 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 81 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 29 झाली आहे. आज 148 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 771 झाली आहे. सध्या एक हजार 469 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 81 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 29 झाली आहे. आज 148 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 771 झाली आहे. सध्या एक हजार 469 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रुग्णालयांत 628 रुग्ण उपचार घेत आहेत. 841 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 828 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार 872 जणांची तपासणी केली. 777 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख दोन हजार 464 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

‘वायसीएम’ची ई-हेल्थ कार्ड सेवा बंद

आज मृत्यू झालेल्या शहरातील महिला पिंपरी (वय 60) व चिंचवड (वय 75) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष कात्रज (वय 48) व महिला जुन्नर (वय 90) येथील रहिवासी आहेत. आजपर्यंत शहरातील एक हजार 789 आणि शहराबाहेरील 749 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज एक हजार 781 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 327 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तीन हजार 19 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 846 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

खासगी रुग्णालयांत केवळ २२५ रुग्ण; कोरोना संसर्ग कमी झाल्याचा परिणाम

आजपर्यंत पाच लाख 94 हजार 98 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 92 हजार 50 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 90 हजार 364 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 81 new corona patients in Pimpri Chinchwad city