नव्वदीतल्या आजी झाल्या भावूक, 'कुटुंबियांच्या जिव्हाळा अन् उपचाराने कोरोनावर मात' 

नव्वदीतल्या आजी झाल्या भावूक, 'कुटुंबियांच्या जिव्हाळा अन् उपचाराने कोरोनावर मात' 

भोसरी : कोरोना पॅाझिटीव्ह झाले. मात्र घाबरले नाही. माझी मुले, सुना, नातवंडे यांनी जीव लावला. त्यांच्या जिव्हाळ्याने आणि डॅाक्टरांच्या उपचाराने कोरोना संकटावर मात केली असे सांगताना भोसरीतील इंद्रायणीनगरात राहणाऱ्या ८५ वर्षांच्या इंदूबाई दिवटे भावूक झाल्या होत्या.

सध्या कोरोना संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. त्यातही ज्येष्ट नागरिकांना होणारा कोरोनाचा संसर्ग चिंता वाढविणारा आहे. मात्र भोसरीतील इंद्रायणीनगरात राहणाऱ्या ८५ वर्षांच्या आजी इंदूबाई दिवटे यांनी कोरोना संसर्गावर केलेली मात ही पॅाझीटिव्ह असणाऱ्या रुग्णांना प्रेरणादायी ठरणार आहे.

इंदूबाई तुकाराम दिवटे यांचे दहा जणांचे एकत्र कुटुंब आहे. इंदूबाई यांचा नातू बॅंगलोरला कामानिमित्त गेला होता. तेथे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. ते घरी आल्यावर त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आजी इंदूबाई, त्यांची सून आणि नात यांनाही त्रास होऊ लागला. त्यांचीही कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली.

अशा प्रकारे दिवटे कुटुंबियातील सात जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दिवटे कुटुंबियांची एकच धावपळ झाली. इंदूबाई यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांचा सिटीस्कॅन केल्यानंतर फुफ्फुसाला सौम्य लागण झाल्याचे निदान झाले. मात्र योग्य उपचार आणि एकत्रित कुटुंब व्यवस्थेत असणारी एकमेकाविषयीचा जिव्हाळा, प्रेम आणि प्रत्येकाने प्रत्येकाची घेतलेली काळजी यामुळे सर्वांनीच कोरोना संकटावर मात केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना पॅाझिटीव्ह झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये. कुटुंबियांद्वारेही कोरोना पॅाझीटिव्ह रुग्णांना आत्मिक बळ दिले पाहिजे. योग्य आहार, सकारात्मक दृष्टीकोन, व्यायाम आणि कुटुंबियांची साथ यामुळे कोरोनावर मात करता येते.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com