पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

गेले सलग पाच दिवस एक हजारहून अधिक असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी थोडी कमी झाली.

पिंपरी : गेले सलग पाच दिवस एक हजारहून अधिक असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी थोडी कमी झाली. मात्र, एकूण रुग्ण संख्या वीस हजाराच्यावर पोहोचली आहे. गुरुवारी शहराच्या विविध भागातील 886 आणि शहराबाहेरील 33, अशा 919 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर 16 जणांचे मृत्यू झाले. त्यात तब्बल 12 पुरुष आहेत. दरम्यान, उपचाराला दहा दिवस पूर्ण आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या 167 जणांना घरी सोडले. सध्या 3303 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकूण मृत्यू 16 

यात पिंपरीतील 55 वर्षीय महिला, पिंपळे गुरवमधील 75 वर्षीय महिला, चिखलीतील 42, 51, 66 वर्षीय असे तीन पुरुष, मोरवाडीतील 57 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65, 62 वर्षीय दोन पुरुष, थेरगावातील 36 वर्षाचा युवक, पिंपरी, संत तुकारामनगर येथील 74 वर्षीय वृद्ध, मोशीतील 70 वर्षीय वृद्ध, रुपीनगर येथील 41 वर्षीय पुरुष, चिंचवडगावातील 75 वर्षीय महिला, नेहरूनगरमधील 75 वर्षीय वृद्ध, विद्यानगर चिंचवड येथील 55 वर्षीय पुरुष, निगडीतील 41 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 

3303 जणांवर उपचार सुरू 

शहरात आजपर्यंत 20 हजार 371 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12445 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 327 जणांचा तर शहराबाहेरील परंतु, महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 82 अशा 409 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3303 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आजचा वैद्यकीय अहवाल

 • दाखल - 4437 
 • पॉझिटिव्ह - 919 
 • निगेटिव्ह - 3624 
 • चाचणी अहवाल प्रतिक्षा - 1326 
 • रुग्णालयात दाखल एकूण - 3303 
 • डिस्चार्ज झालेले एकूण - 3917 
 • आजपर्यंतची पॉझिटीव्ह संख्या - 20,317 
 • सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या - 3303 
 • आजपर्यंत मृत्यू झालेले रुग्ण - 409 
 • आजपर्यंत कोरोना मुक्त -12445 
 • दैनंदिन भेट दिलेली घरे - 25541 
 • दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 84027

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 886 new corona positive in pimpri chinchwad