पिंपरी-चिंचवड शहरात साडेनऊ हजार सक्रिय रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

सध्या नऊ हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा हजार 415 रुग्ण महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांतून आज एक हजार 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 104 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 66 हजार 483 झाली. सध्या नऊ हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा हजार 415 रुग्ण महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. 

शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांतून आज एक हजार 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 853 झाली आहे. त्यात शहरातील रुग्णांची संख्या 52 हजार 530 आहे. तीन हजार 323 रुग्ण शहराबाहेरील आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज शहरातील 12 व शहराबाहेरील नऊ अशा 21 जणांचा मृत्यू झाला. त्यात 19 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण मृतांची संख्या एक हजार 77 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 313 झाली आहे. 

शहराबाहेरील 86 रुग्ण आज शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. आजपर्यंत शहराबाहेरील एक हजार 281 रुग्णांनी शहरात उपचार घेतले आहेत. तसेच, शहरातील रहिवासी असलेले 430 रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज मृत झालेल्या शहरातील व्यक्ती चिंचवड (स्त्री वय 78, पुरुष वय 64 व 45), चिखली (पुरुष वय 40), कोकणेनगर (पुरुष वय 58), सांगवी (पुरुष वय 64 व 72), तळवडे (पुरुष वय 68), पिंपरी (पुरुष वय 81), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष वय 82), भोसरी (पुरुष वय 65), दापोडी (स्त्री वय 65) येथील रहिवासी आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज मृत झालेल्या शहराबाहेरील व्यक्ती खेड (पुरुष वय 73), मारुंजी (पुरुष वय 60), जुन्नर (पुरुष वय 40), लोहगाव (पुरुष वय 71), कात्रज (पुरुष वय 37), मावळ (पुरुष वय 39), आंबेगाव (पुरुष वय 62), चाकण (पुरुष वय 43) आणि कुरकुंडी (पुरुष वय 61) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above Nine thousand active patients in Pimpri-Chinchwad city