
महापालिकेच्या आठही (अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी - महापालिकेच्या आठही (अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विविध प्रकारचे यंत्र पुरविण्याकरिता सुमारे एक कोटी 88 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासह विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे 45 कोटी 60 लाख रुपये खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिसऱ्या टप्प्यातील कामे करण्यासाठी महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्यात करार केला जाणार आहे. त्यासाठीची रक्कम व जीएसटीबाबत करारनामासाठी 15 टक्के रक्कम अर्थात 86 लाख रुपये आगाऊ स्वरुपात बॅंक गॅरेंटीसाठी देण्यात येणार आहेत. त्यासह काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आणि नाशिक फाटा ते वाकड या रस्त्यांवर सेवा वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या एक कोटी 83 लाख रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली.
सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु
प्रभागनिहाय कामे व खर्च
प्रभाग 16 - रावेत व किवळे स्मशानभूमी दुरुस्ती - 27 लाख
प्रभाग 20 - कासारवाडी, वल्लभनगर, लांडेवाडीतील सांडपाणी वाहिन्या दुरुस्ती - 29 लाख
प्रभाग 10 - विद्यानगर, दत्तनगर परिसरातील जलनि:सारणाची कामे - 32 लाख
प्रभाग 18 - महापालिका शाळा इमारतीची देखभाल दुरुस्ती - 27 लाख
प्रभाग 13 - सेक्टर 22 मधील पवळे शाळा इमारतीचे मजबुतीकरण - 27 लाख
प्रभाग 8 - उद्यानांमध्ये विद्युत विषयक नुतनीकरणाची कामे - 42 लाख
प्रभाग 2 - रस्ते सुशोभिकरणांतर्गत विद्युत विषयक कामे - 38 लाख
प्रभाग 11 - कुदळवाडी शाळा इमारतीचे सुशोभिकरण - 42 लाख
प्रभाग 12 - रुपीनगर ते धनगरबाबा मंदिरापर्यंतच्या नाल्याचे काम - 57 लाख
प्रभाग 14, 15 व 19 - जलनि:सारण देखभाल दुरुस्ती - 85 लाख