कोरोना रुग्णाच्या पलायनामुळे प्रशासनाची धावपळ

तळेगाव स्टेशन - रुग्णालयातून पळालेल्या कोरोना बाधित महीला रुग्णास ताब्यात घेताना पथक.
तळेगाव स्टेशन - रुग्णालयातून पळालेल्या कोरोना बाधित महीला रुग्णास ताब्यात घेताना पथक.

तळेगाव स्टेशन - डाॅ.भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील मायमर कोविड हाॅस्पीटलमधून मनोरुग्ण महीला कोरोना रुग्णाने पलायन केल्याची घटना बुधवारी (ता. ०८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिस आणि कोविड पथकाच्या तासाभराच्या अथक परिश्रमानंतर सदर महीलेला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या तीन जुलैला तळेगावातील कोविड हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेली कामशेत येथील पंचेचाळीस वर्षीय महीला रुग्णालयाच्या तळमजल्यावरील रेलींगवरुन आठ फुटावरुन उडी मारुन पळाली.कोविड कक्षातील महीला परिचारिकांना हिसका मारुन ही महीला पळाली. सदर रुग्ण महीलेला  थोपावण्याचा प्रयत्न करणा-या रुग्णालयातील एका कर्मचा-यावर तिने दगड भिरकावल्याने तो किरकोळ जखमी झाला.सदर महीला चाकण महामार्ग ओलांडून सैरभैर पळत वतननगरमध्ये घुसली.

माहीती मिळताच पोलिस आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी यांनी महीलेचा पाठलाग केला. तिला एका नवीन बांधकाम चालू असलेल्या गृहप्रकल्पामध्ये दुरुन घेराव टाकत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. महीलेने त्यांच्यावरही दगड भिरकावले. अखेर पीईपी किट परिधान करुन पुर्ण तयारीनिशी आलेल्या कोविड हाॅस्पीटलच्या चार जणांच्या पथकाने मोठया शिताफीने या महीलेस पकडून जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवले.साडेसहाच्या सुमारास पुन्हा या महीलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारात पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचा-यांची पुरती धावपळ उडाली.सदर महीलेचा मूलगा देखील कोरोना बाधित असून रुग्णालयात उपचार घेत आहे. ही महीला रुग्णालयात दाखल होण्या अगोदरपासून माणसोपचार घेत असून वेडाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे मायमर कोविड रुग्णालयाचे प्रभारी डाॅ.सुदीप कुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com