पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

सार्वजनिक वाहतूक कार्यान्वित राहणार असली तरी रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीत चालक व वाहनाच्या ५०% क्षमेते एवढे प्रवासी तर बसमध्ये आरटीओने मान्य केलेली आसन क्षमतेनुसार परवानगी असेल. 

पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (ता.६)काढले आहेत. या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा यावेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे. वैद्यकीय व इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत.आठवड्यातील सर्व दिवशी सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रिडांगणे बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स दिवसभर बंद राहतील. तसेच अत्यावश्यक दुकानाचे परिसरात ग्राहकांमधील सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.  जीवनावश्यक वस्तू दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. 

कोरोनामुळे अवघ्या 24 तासात जुळ्यांनी हरवले आईचं छत्र, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना
 

सार्वजनिक वाहतूक कार्यान्वित राहणार असली तरी रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीत चालक व वाहनाच्या ५०% क्षमेते एवढे प्रवासी तर बसमध्ये आरटीओने मान्य केलेली आसन क्षमतेनुसार परवानगी असेल.  सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क परीधान करणे आवश्यक राहील, योग्य प्रकारे मास्क परीधान न केल्यास रक्कम रुपये पाचशे रुपये दंड आकारुन वसुल केला जाईल.
 

चिखलीत घरात शिरून महिलेला मारहाण करून हिसकावले दागिने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Pune All shops will be closed in Pimpri Chinchwad except the essential ones