VIDEO : कोरोनात जीव धोक्यात घालूनही पिंपरीतील 'वायसीएम'च्या डॉक्टरांना वेतन नाही!

सोमवार, 1 जून 2020

वायसीएम रुग्णालयाच्या आवारात सकाळी साडेअकरा वाजता ठिय्या आंदोलन केले.

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती कोविड रुग्णालयासमोर 32 सीपीएस निवासी डॉक्टरांनी  'समान काम, समान वेतना'साठी आंदोलनाचा पवित्रा घेत आज (सोमवार, ता.1) निषेध नोंदवला. रुग्णालयाच्या आवारात सकाळी साडेअकरा वाजता ठिय्या आंदोलन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या अडीच महिन्यापासून 24 हजार 800 रुपये तुटपुंजे  विद्यावेतन मिळत आहे. मात्र, इतर डॉक्टरांना 55 हजार प्रती महिना वेतन मिळत आहे. आज आम्ही कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून काम करत आहोत. पण आमच्या या मागणीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अधीष्ठता राजेंद्र वाबळे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. आता राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार आयुक्तांनी  मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच लेखी आश्वासन देणे आवश्यक आहे. तरच पुढे जाऊन आम्ही काम करणार आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंदोलनकर्ते  डॉक्टर म्हणाले, "शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ठाणे महापालिका संस्था व  रुग्णालयामध्ये पूर्वीपासून सीपीएस डॉक्टर्स व  इतर एमबीबीएस असा भेदभाव न करता समान विद्या वेतन देण्यात येते. दरम्यान काळात राज्य सरकार व बृहन्मुंबई महापालिकेने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या संबंधित निर्णय तातडीने घेतलेले आहेत. त्यांच्या प्रमाणेच आम्हीदेखील काम करत आहोत, पण आमच्या वेतनात मोठी तफावत आहे. म्हणून आम्ही निराशेत गेलो आहोत."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा