चिखलीतील टोळ्यांचा वाद चिघळला; खूनानंतर एका टोळीकडून वाहनांची तोडफोड

चिखलीतील टोळ्यांचा वाद चिघळला; खूनानंतर एका टोळीकडून वाहनांची तोडफोड

पिंपरी : चिखलीतील घरकुल परिसरात आक्‍या बॉण्ड टोळीने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविल्याची घटना शनिवारी (ता. 30) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टोळीच्या वर्चस्व वादातून शुक्रवारी (ता. 29) रात्री साडेआठच्या सुमारास आक्‍या बॉण्ड टोळीतील अनिकेत प्रकाश रणदिवे (वय 18, रा. घरकुल, चिखली) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी अमित चव्हाण टोळीतील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चिखली परिसरात आक्‍या बॉण्ड व चव्हाण या दोघांच्या टोळ्या असून या टोळ्यांमध्ये वर्चस्व वादातून नेहमी वाद होत असतात. काही दिवसांपूर्वी चव्हाण याच्यावर काही जणांनी हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी आक्‍या बॉण्ड याचा मित्र अनिकेत याच्यावर शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला. 

दरम्यान, अनिकेत याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आक्‍या बॉण्ड टोळीने शनिवारी अमित चव्हाण राहत असलेल्या घरकुल परिसरातील वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com