esakal | आळंदी-मावळ परिसरात धुंवाधार पाऊस; इंद्रायणीला महापुर
sakal

बोलून बातमी शोधा

indrayani

आळंदी-मावळ परिसरात धुंवाधार पाऊस; इंद्रायणीला महापुर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी : मावळ (maval)भागाातील दमदार पावसामुळे रात्रीपासुन आळंदीतील (alandi) इंद्रायणीला (indrayani) महापुर आला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि इंद्रायणी काठचे दोन्ही दगडी आणि भक्ती सोपान पुल पाण्याखाली आहे. तर पुंडलिक मंदीर अर्धे पाण्याखाली बुडाले आहे. (Alandi Maval area Heavy rains Mahapur Indrayani)

हेही वाचा: माजी आमदाराच्या निवाऱ्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

काल सायंकापळपर्यंत पुराची पातळी जेमतेम होती. रात्रीनंतर मात्र पुराच्या पाण्यात मोठी वाढ झाल्याने शहराला पाणी पुरवणारा बंधारा, कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, भक्ती सोपान पुल पाण्याखाली गेला आहे. तर पुंडलिक मंदीरही अर्धे पाण्याखाली आहे. पुरामुळे जलपर्णी वाहुन गेली असुन, वाहतुक मात्र सुरळीत सुरु आहे. दरम्यान, पोलीसांच्यावतीने नदीकाठच्या लोकाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

loading image