पिंपरी : चिखलीत गोंधळ घालणाऱ्या मद्यपींनीचं होमगार्डला...  

पिंपरी : चिखलीत गोंधळ घालणाऱ्या मद्यपींनीचं होमगार्डला...  

पिंपरी : दुकानासमोर गोंधळ घालणाऱ्या मद्यपींना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या होमगार्डला तीन जणांनी मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली. 

घरकुल परिसरातील एका दुकानासमोर रविवारी (ता.24) दुपारी मद्यपी गोंधळ घालत होते. त्यावेळी होमगार्डने त्याठिकाणी जाऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान एका मद्यपीने होमगार्डला शिवीगाळ केली. त्यामुळे होमगार्डने त्याला काठी मारली. यावरून मद्यपी आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी मिळून होमगार्डला मारहाण केली. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मारहाण झालेला होमगार्ड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत असून तो रविवारी ड्युटीवर नव्हता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच रविवारी पुन्हा होमगार्डवर हल्ला झाल्याची घटना घडली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडी येथे 14 मे रोजी गर्दी पांगवित असताना दहा जणांनी मिळून पोलिसाला शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. 
याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) असे हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तसेच बोपखेल फाटा येथील 10 मे रोजी नाकबंदीच्या ठिकाणी  वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून महेंद्र रविंद्र वाघमारे याने पोलिस हवालदार संजय कामठे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आरोपीला पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यासह मागील महिन्यात बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना काळेवाडी येथे घडली. विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. मनुष्यबळ अपुरे असतानातही तारेवरची कसरत करीत बंदोबस्त्याचे योग्य नियोजन केले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांची अक्षरशः झोप उडाली आहे. तरीही नागरिकांसाठी चोवीस तास रस्त्यावर असलेल्या पोलिसावर हल्ले होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com