चिंचवडमध्ये भरदिवसा टोळक्याचा एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पळून जाताना पाठलाग करून पुन्हा हल्ला
Gangwar
GangwarSakal

पिंपरी - 'तुला सांगूनही तू माझे ऐकले नाही' असे म्हणत तरुणाला मारहाण करून कोयत्याने वार केले. तरुणाने टोळक्याच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून पुन्हा त्याच्यावर कोयत्याने व सत्तूरने टोळक्याने हल्ला केला. ही घटना चिंचवड येथे भरदिवसा घडली. सागर निवृत्ती बोन्द्रे (वय २५, रा. टॉवर लाईन, तळवडे, मुळ- बुलढाणा) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी संतोष कळसकर, आदित्य दीपक तेली, रणजित प्रल्हाद शेडगे व आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सागर हे त्यांच्या पत्नीला कामावर सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, चिंचवडमधील विद्यानगर येथील पदमसी बाबर चौक येथे आरोपी संतोष याने त्यांना थांबवले. तुझ्याशी बोलायचे असल्याचे सांगत वाॅशिंग सेंटरच्या मागे नेले. तुला सांगु नाही तू माझे ऐकले नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. त्यानंतर सागर हे त्यांच्या तावडीतून सुटून परशुराम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने पळू लागले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या डोक्यात कोयत्याने सत्तूरने वार केले . यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com