'कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वयंसेवक व्हा', अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

पंतप्रधानांनी 'यंग इंडिया' म्हटले असताना 'आपण नाही तर कोण?' या विचाराने व संकट काळात देशाला आपली गरज असताना मागे का राहायचे, या भावनेने स्वयंसेवकाच्या माध्यमातून काम करणे माझे कर्तव्य समजतो.

पिंपरी : "कोरोनासारख्या संकटात देशाला मदत करण्याची आपली गरज असताना तरुण म्हणून आपले काही कर्तव्य आहे, असं समजतो. आणि आपण आपल्या समाजाचे निश्‍चित देणं लागतो, या भावनेने महापालिकेसोबत स्वयंसेवक म्हणून काम करायचे ठरवले. शहरातील प्रत्येकाला आवाहन करतो की, आज आपण काळजीपूर्वक मदत करावी. जेणेकरून शहरावरील हे संकट दूर होऊन परिस्थिती पूर्ववत होण्यास मदत होईल," ही भावना आहे महापालिकेच्या कोरोना वॉररूममध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या युवकाची. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पद्मेश कुलकर्णी. राहणार चिंचवडगाव. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या (सीओईपी) अर्बन प्लॅनिंग (नगररचना) शाखेचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी. गेल्या पाच महिन्यांपासून वॉररूममध्ये काम करतोय. महापालिकेने कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी वॉररूम तयार केली आहे. इथे सध्या 60 स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यातीलच एक पद्मेश. तो म्हणाला, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने महापालिकेच्या अनेक उपक्रमात मदतकार्य राबविण्यात आले. त्यातही सहभागी होतो. मे महिन्यात परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी जी सरकारी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये चिंचवड पोलिस ठाणे व तालेरा रुग्णालयात काही दिवस काम केले. त्यानंतर संपूर्ण शहरात काढा वाटप करायचा होता. त्यातही सहभागी घेतला. जून महिन्यापासून महापालिका कोविड वॉररूममध्ये काम करतो आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍपद्वारे सहभागी झालो. पुण्यात काही दिवस मास्क वाटप केले.'' 

Image may contain: 1 person, standing, suit and indoor
पद्मेश कुलकर्णी

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधानांनी 'यंग इंडिया' म्हटले असताना 'आपण नाही तर कोण?' या विचाराने व संकट काळात देशाला आपली गरज असताना मागे का राहायचे, या भावनेने स्वयंसेवकाच्या माध्यमातून काम करणे माझे कर्तव्य समजतो. तसेच, आपण आपल्या समाजाचे निश्‍चित देणं लागतो, या भावनेने काम करायचे ठरवले. आज आपण गरज असताना काळजीपूर्वक मदत करावी. जेणेकरून शहरावरील हे संकट दूर होऊन परिस्थिती पूर्ववत करण्यास मदत होईल, असे आवाहनही प्रद्मेशने केले आहे. 

कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरात लॉकडाउन लागले. तेव्हापासून सर्व सरकारी व्यवस्था ही महामारी रोखण्यासाठी जोखीम घेत दिवसरात्र काम करीत आहे. परंतु, संसर्ग झपाट्याने पसरल्याने सर्व व्यवस्थेवर अधिक ताण आला. त्यामुळे या व्यवस्थेला मदत करायची, म्हणून मी स्वयंसेवक म्हणून रूजू झालो. 

- पद्मेश कुलकर्णी, स्वयंसेवक वॉररूम, महापालिका 

स्वयंसेवक नोंदणीसाठी 

ऍप : #PCMCSmartSarathi 

संपर्क क्रमांक : 8080049900 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of engineering student working in Pimpri Chinchwad Municipal Corporation's Corona Warroom