पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात एक उपायुक्त अन् दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती 

आशा साळवी
Thursday, 1 October 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात एक उपायुक्त, दोन नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात एक उपायुक्त, दोन नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी (ता. 1 ) रात्री उशिरा गृह विभागाने काढले. 

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

उपमहानिरीक्षक, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयांच्या गृह विभागाने बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नाशिक येथील पोलिस अकादमीचे अधीक्षक आनंद भोईटे यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर लोहमार्गचे सहायक पोलिस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील व राज्य गुप्तवार्ता विभाग, पुण्याचे अपर पोलिस उपायुक्त नंदकिशोर पिंजण यांची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्त अश्विनी राख यांची पुण्यातील एमआयए अपर पोलिस अधिक्षकपदी, तर रामचंद्र जाधव यांची जालना येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात उपअधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of one Deputy Commissioner and two Assistant Commissioners in Pimpri-Chinchwad Police Commissionerate