डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन नवे अभ्यासक्रम होणार सुरू; देशात थोड्याच महाविद्यालयांना परवानगी

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन नवे अभ्यासक्रम होणार सुरू; देशात थोड्याच महाविद्यालयांना परवानगी

पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि रोबोटिक्‍स अँड ऑटोमेशन या दोन नव्या बहुचर्चित विद्याशाखा सुरू होणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) संस्थेला हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. 

सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील कृषी, आरोग्य, दळणवळण, संचार, बांधकाम क्षेत्र, आपत्त्ती व्यवस्थापन, संरक्षण, छोटे-मोठे उद्योग यांना या दोन शाखांमधील कुशल अभियंत्यांची भविष्यात लागणारी गरज लक्षात घेता संस्थेने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. नव्या युगातील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवे दालन खुले केले आहे. 

देशभर फार थोड्या महाविद्यालयांना हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यात संस्थेचा समावेश झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या रोबोटिक्‍स लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब तसेच हे विषय शिकविण्यासाठी आवश्‍यक असलेले तज्ज्ञ प्राध्यापक हे डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पिंपरी पुणे या महाविद्यालयात आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने विशेष म्हणजे दरवर्षी देण्यात येणाऱ्या एनआयआरएफ (NIRF) रॅंकींगमध्ये डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास देशभरातील सर्वोत्कृष्ट 200 अभियांत्रीकी महाविद्यालयांमध्ये स्थान मिळालेले आहे. हे महाविद्यालय नॅक व एनबीएद्वारा मानांकित असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्याला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एआय, रोबोटिक्‍स - भारताचे भवितव्य 

देश आदराने 'फादर ऑफ इंडियन आयटी इंडस्ट्रीज्‌' असे संबोधतो असे एफ. सी. कोहली यांनी भारत जागतिक आयटी उद्योगात अग्रभागी राहील, असे भाकीत 40 वर्षांपूर्वी केले होते. ते खरे ठरले. त्याच कोहली यांनी भविष्यात भारत एआय क्षेत्रात केंद्रस्थानी राहील, असे म्हटले आहे. जगाला पुरविल्या जाणाऱ्या एआय सेवा, सुविधांचा किमान 40 टक्के वाटा भारताचा असेल असा अंदाज आहे. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि रोबोटिक्‍स ऑटोमेशन या क्षेत्रांत प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची ही चिन्हे आहेत. टेस्लाचे ऑटोपायलट आणि गुगलचे डीप माइंड ही कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रमुख उदाहरणे आहेत, असे संस्थेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com