Ashadi wari 2022 wari Container accident Death of 1 Warkari 3 Warkari injured pimpri
Ashadi wari 2022 wari Container accident Death of 1 Warkari 3 Warkari injured pimprisakal

दिंडीत भरधाव कंटेनर शिरला; एका वारकऱ्याचा मृत्यू; ३ वारकरी जखमी

देहू-आळंदी मार्गावरील चिखली येथील घटना

पिंपरी : देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरला. यामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन वारकरी जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.२०) देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ घडली. भगवान साहेबराव घुगे (वय ३०, रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. तर बबन जयभाये, पुंजाबाई हुसे, भिकाजी बनसोडे (सर्व रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भास्कर बाजीराव जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार कंटेनर चालक जगन्नाथ भानुदास मुंडे (वय ४२, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृत घुगे, जखमी व इतर सहकारी हे देहू येथे दर्शन घेवून आळंदीच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी कॅनबे चौक ते चिखली या दरम्यान भरधाव कंटेनरने चौघांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने घुगे यांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून कंटेनर चालकाला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com