चिंचवडमध्ये चोरट्यांनी पळविले चक्क एटीएम मशीनच

चिंचवडमध्ये चोरट्यांनी पळविले चक्क एटीएम मशीनच

पिंपरी : एटीएम फोडून रक्कम चोरीला गेल्याच्या घटना ऐकायला मिळत असतात. मात्र, चिंचवड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. थरमॅक्स चौक येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले आहेत. 

चिंचवडमधील थरमॅक्स चौक येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी (ता.9) पहाटे चार ते पाच चोरटे छोट्या टेम्पोतून येथे आले. त्यांनी एटीएमला मोठी दोरी बांधून येथील ओढत बाहेर आणले. एटीएम मशीन हलण्याने तेथील सायरन वाजू लागला. मात्र, सायरन वाजत असतानाही चोरट्याने येथील मशीन टेम्पो टाकून तेथून पळ काढला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, सायरनचा आवाज ऐकून शेजारील सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पोचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com