पिंपरी : चिखलीत दोन टोळ्यांचा वाद अन् एकावर धारदार हत्याराने...

पिंपरी : चिखलीत दोन टोळ्यांचा वाद अन् एकावर धारदार हत्याराने...

पिंपरी : चिखलीतील घरकुल येथे दोन टोळ्यांच्या वर्चस्व वादातून एका सराईत गुन्हेगारावर धारदार हत्याराने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (ता. 29 ) रात्री आठच्या सुमारास घडली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनिकेत प्रकाश रणदिवे (वय 18, रा. घरकुल, चिखली) हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. टोळ्यांच्या वर्चस्व वादातून अनिकेत याचे काही जणांसोबत वाद होते. या वादातून शुक्रवारी तिघांनी अनिकेत याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. 
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उपचारासाठी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com