पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा पोलिसांवर हल्ला; दहा जणांनी मिळून केली मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा पोलिसांवर हल्ला; दहा जणांनी मिळून केली मारहाण

पिंपरी : काळेवाडी, बोपखेलमधील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच दापोडी येथे पुन्हा पोलिसावर हल्ला झाला. मागील पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. गर्दी पांगवित असताना दहा जणांनी मिळून पोलिसाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दापोडीत घडली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवर कर्तव्यावर असताना वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. 

आयाज भिकात शेख, गालिब भिकात शेख (वय 28), समीर सलीम शेख (वय 18, सर्व रा. इकरा इंग्लिश मिडीयम स्कुलजवळ, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे इतर सात साथीदार फरारी आहेत. तर सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) असे हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी (ता.13) सकाळी पावणेनऊच्या सुमारास दापोडी-बोपोडी पुलाजवळील पवार वस्ती येथील स्मशानभूमीजवळ गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवित असताना आरोपींनी वाघमारे यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. मनुष्यबळ अपुरे असतानातही तारेवरची कसरत करीत बंदोबस्त्याचे योग्य नियोजन केले जात आहे. मागील दीड महिन्यांपासून पोलिसांची अक्षरशः झोप उडाली आहे. तरीही नागरिकांसाठी चोवीस तास रस्त्यावर असलेल्या पोलिसावर हल्ले होत आहेत.  

बोपखेल फाटा येथील नाकबंदीच्या ठिकाणी रविवारी (ता.10 मे) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून महेंद्र रविंद्र वाघमारे याने पोलिस हवालदार संजय कामठे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यासह पंधरा दिवसांपुर्वीदेखील बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी युनूस गुलाब अत्तार, मतीन युनूस अत्तार, मोईन युनूस अत्तार या तिघांना अटक केली. या घटना ताज्या असतानाच बुधवारी पुन्हा पोलिसावर हल्ला झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com