पिंपरी : पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र थांबता थांबेना!

पिंपरी : पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र थांबता थांबेना!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. चिंचवड स्टेशन येथे महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या पोलिसाला जमावकडून धक्काबुक्की घटना गुरुवारी (ता. 28) घडली. मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना असून महिनाभरातील पाचवी घटना आहे. 

दीपक गोरोबा टेंकाळे (वय 30) असे धक्काबुक्की झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. चिंचवड स्टेशन येथील साईबाबा झोपडपट्टी येथे गुरुवारी रात्री काहीजण एका महिलेला त्रास देत असल्याने तिच्या मदतीसाठी पोलिस त्याठिकाणी गेले. त्यावेळी तेथे जमलेल्या जमावाकडून पोलिस कर्मचारी टेंकाळे यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी हरिष प्रकाश शेलार (वय 28), विजय गौतम शेलार (वय 29), सीता गणेश कसबे (वय 45) यांना अटक केली आहे. तर सतीश विजय जाधव, रेश्मा विजय जाधव यासह आणखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात काळेवाडी, बोपखेल, दापोडी, कुडळवाडी येथे पोलिसांवर हल्ले झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी (ता. 26 ) नितीन अप्पा खेसे (वय 30) या पोलिसावर हल्ला झाला. हॉर्न वाजवू नका, रस्त्यात उभी केलेली गाडी बाजूला घ्या, असे म्हटल्याच्या कारणावरून आरोपीने दमदाटी करीत खेसे यांच्या कानाखाली मारून धक्काबुक्की केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
दापोडी -बोपोडी पुलाजवळील पवार वस्ती येथील स्मशानभूमीजवळ 13 मी रोजी गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवित असताना दहा जणांच्या टोळक्याने सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यांना लाथा-बुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यासह बोपखेल फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी 10 मे रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून एकाने पोलिस हवालदार संजय कामठे,  पोलिस कॉन्सटेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपीला पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यासह मागील महिन्यातदेखील काळेवाडी येथे बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. या घटना ताज्या असतानाच गुरुवारी पुन्हा पोलिसावर हल्ला झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com