esakal | पिंपरी : लस घेतल्यानंतर औषध द्यायला टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Medicine

पिंपरी : लस घेतल्यानंतर औषध द्यायला टाळाटाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लस घेतल्यानंतर ताप किंवा डोकं दुखेल, वेदना होतील, या हेतुने सर्वसामान्यांना औषधे दिली जात होती. यामध्ये डोकेदुखी व तापाच्या गोळ्या होत्या. परंतु, ही प्रतिबंधक औषधे सध्या बऱ्याच ठिकाणी दिली जात नसल्याचे लस घेतलेल्या नागरिकांनी सांगितले. नागरिकांना औषधांसाठी विचारपूस केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी, नागरिकांकडून चुकीची औषधे घेतली गेल्यास त्रास होण्याची भीती अधिक आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडला डेंग्यूसह मलेरियाची भिती

बरेच नागरिक कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर ताप आणि दुखण्याने बेजार झाले होते. दोन दिवस काही सुचले नाही. अशा वेळी सर्वांना औषधे गोळ्या दिल्या जात होत्या. तत्काळ औषधे घेतल्यानंतर बरे वाटत होते. परंतु, ही औषधे देणे अचानक बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना लस घेतल्यानंतर मेडीकलमध्ये जाऊन नेमकी कोणते औषध घ्यावे याचे ज्ञान नाही. त्यामुळे कोणतीही चुकीची औषधे घेऊन ॲलर्जी होण्याची भीती जास्त सतावत आहे.

हेही वाचा: पिंपरी : शहरातील विधवांसाठी तीन महिन्यांत 'जॉब फेअर'

लस घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी देखील नागरिकांना विश्रांती व बसण्याचा सल्ला दिला जात नाही. तसेच औषधे देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. औषधांचा पुरवठा लस केंद्रावर होत नसल्याचे तसेच ही औषधे आल्यास नेमकी जातात कुठे? हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.

"२९ तारखेला रविवारी मी आचार्य अत्रे सभागृहात लस घेतली. परंतु, लस टोचल्यानंतर सिस्टरला मी औषधे मागितली. तर त्यांनी मेडीकलमध्ये जाऊन औषध घेण्याचा सल्ला दिला."

- महिला, कासारवाडी

"लस घेतल्यानंतर प्रोटीनसाठी व रिॲक्शन येवू नये यासाठी औषधांची आवश्यकता आहे. असह्य ताप व अंग दुखीसाठी औषधे गरजेची आहेत."

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

loading image
go to top