पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

पिंपरी शहरातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले आहे. त्यामुळे महापालिका नगरसेवकपदाच्या तीन जागा रिक्त आहेत. या जागांसाठी पोटनिवणूक केव्हा होणार? याची प्रतीक्षा संबंधित प्रभागातील इच्छुकांना लागली आहे.

पिंपरी - शहरातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले आहे. त्यामुळे महापालिका नगरसेवकपदाच्या तीन जागा रिक्त आहेत. या जागांसाठी पोटनिवणूक केव्हा होणार? याची प्रतीक्षा संबंधित प्रभागातील इच्छुकांना लागली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राज्यातील औरंगाबादसह अन्य महापालिका निवडणुकांसोबत शहरातील पोटनिवडणूक होईल, अशी शक्‍यता जाणकार व्यक्त करीत आहेत. 

अ‍ॅपवरील ओळखीतून केला विधवेवर बलात्कार

महापालिका प्रभाग एक चिखली येथील नगरसेवक दत्ता साने यांचे चार जुलै रोजी, प्रभाग १४ आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांचे ३१ जुलै आणि प्रभाग चार दिघी- बोपखेलचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे २६ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. साने व शेख राष्ट्रवादीचे आणि उंडे भाजपचे नगरसेवक होते. साने यांच्या निधनाला चार जानेवारी रोजी सहा महिने पूर्ण झाले. त्यामुळे आतापर्यंत या जागांसाठी पोटनिवडणूक व्हायला हवी होती, अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासोबतच पोटनिवडणूक होईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. आता औरंगाबादसह राज्यातील पाच महापालिकांची निवडणूक येत्या दोन महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यासोबत पोटनिवडणूक होईल, असे जाणकारांचे मत आहे. 

रस्त्यावर शतपावली करीत असताना तरुणावर झाला गोळीबार

अहवाल पाठवला आहे
शहरातील तीन नगरसेवकांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या तीनही जागांबाबतचे अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे त्या-त्या वेळी पाठवले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक होईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awaiting byelections for three seats in Pimpri Chinchwad city