सौंदर्य खुलविणारे ब्युटी पार्लर आता निघाले विक्रीत

सौंदर्य खुलविणारे ब्युटी पार्लर आता निघाले विक्रीत

पिंपरी : एकेकाळी सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय म्हणजे रोज हजारो रुपयांची कमाई. ब्युटी व्यवसायातील पदवी असो अथवा नसो. केवळ हाताच्या कौशल्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला तो ब्युटी पार्लरच्या क्षेत्रात. आता याच ब्युटी पार्लर चालक महिलांना पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ब्युटी पार्लर सेटअप व गाळे विक्रीत काढण्याची वेळ आली आहे. तर काही गाळ्यांचे भाडे थकल्याने 'ब्युटी पार्लर बंद आहे' अशी पाटी लावण्याची नामुष्की या महिलांवर येऊन ठेपली आहे.

ब्युटी पार्लर चालक ईशा सांगते, 'दर महिन्याला महिलांच्या विविध हेअरस्टाईल व स्कीनच्या उपचारासाठी महागडे प्रॉडक्‍ट खरेदी करावे लागत होते. तीन महिन्यापर्यंत हे प्रॉडक्‍ट डीलर पैशासाठी थांबले. मात्र, आता त्यांनी देखील पैशाचा तगादा सुरु केला आहे. काही प्रमाणात ब्युटी पार्लर उघडले आहेत. मात्र, महिला संसर्गाच्या भीतीपोटी येत नाहीत. तरी देखील आम्ही काळजी घेऊन काम करत आहे. दुपारी दोन नंतर ब्युटी पार्लर बंद करतो,त्यामुळे महागड्या हेअर व स्कीन ट्रीटमेंट करता येत नाहीत.' लग्नाची देखील एखादी ऑर्डर मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तनुजा म्हणते, 'नुकतेच मी वाकड येथून ब्युटी पार्लर बदलले. तेथे भाडे वाढविले म्हणून कासारवाडीत पार्लर सुरु केले. कुठे जम बसला की लॉकडाउन सुरु झालं. आता सरकारने परवानगी दिली आहे पण गिऱ्हाईकच नाही. पार्लरमध्ये सर्व डिस्पोजल वस्तू आम्ही वापरीत आहोत. मात्र, याचा खर्च परवडत नाही. पार्लरचे दर वाढविले तर गिऱ्हाईक पुन्हा येणार नाही. बऱ्यापैकी पार्लरचे क्‍लासेस सुरु होते ते देखील बंद झाले आहेत. तो पर्यायी इनकमचा एक मार्ग होता. पार्लरमध्ये वारंवार खुर्च्या व सर्व वस्तू सॅनिटाइज कराव्या लागत आहेत. शिवाय गिऱ्हाईक आता कॉल करूनच पार्लरला येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा वाढला खर्च...

पार्लरमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकासाठी थर्मल तपासणी मशीन आहे. शिवाय डिस्पोजल गाऊन, हॅंडग्लोव्हज, नॅपकीन, बेडशीट, टीश्‍यू व कॉटनचा खर्च वाढला आहे. पार्लरचे काही कंपन्यांचे प्रॉडक्‍ट सध्या मिळत नाहीत, जे मिळतात त्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना ते खरेदी करणे अवघड झाले आहे. तर काहींनी ब्युटी पार्लर विथ स्पामध्ये केलेली गुंतवणूकीच्या सेटअपलाही गिऱ्हाईक मिळेनासे झाले आहे.

असा लागत होता हातभार

कुटुंबासाठी या व्यवसायातून महिलांना हातभार लागत होता. काही महिला चालक पतींच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड झाले आहे. काहीजणींनी घरातून व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जवळपास आठ हजारांपासून ते एक लाखापर्यंत पार्लरचे गाळे भाडे आहे. परंतु आता थकीत रकमेत वाढ होत चालल्याने गाळेमालक राहावयास तयार नाहीत. थेट गाळे खाली करण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव आता व्यवसाय बंद करण्याची वेळ या महिलांवर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com