450 वर्षांपासून सुरू असलेली चिंचवडमधील या यात्रेत यंदा पडणार खंड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

गेली साडेचारशे वर्ष सुरू असलेली श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंगलमूर्ती भाद्रपदी यात्रा यंदा कारोनामुळे भरणार नाही.

पिंपरी : गेली साडेचारशे वर्ष सुरू असलेली श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंगलमूर्ती भाद्रपदी यात्रा यंदा कारोनामुळे भरणार नाही. तसेच श्रीक्षेत्र मोरगाव येथील मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार नसल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाद्रपद प्रतिपदेला दरवर्षी श्री मोरयांची पालखी चिंचवडगावातून निघते. पुण्यातील एकनाथ मंगल कार्यालय कसबा पेठेत पालखीचा पहिला मुक्काम होतो. त्यानंतर तेथे मोरया गोसावींची पदे गायली जातात. द्वितीयेला पालखी पहाटे निघते. दुपारी नैवेद्य झाल्यानंतर हडपसर वाटिका आश्रमात ती थांबते. दुसऱ्या दिवशी रात्री पालखी सासवड येथे मुक्कामाला असते. तृतीयेला जेजुरी पायथ्यापासून पालखी निघते. त्यानंतर मोरगाव वेशीवर जाते. ग्रामस्थ पालखीचे जंगी स्वागत करतात. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍याच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत केले जाते. त्यानंतर धूळभेट कार्यक्रम होतो. 

Image may contain: 8 people, crowd and outdoor

गणरायाच्या स्वागताला उद्योगनगरी सज्ज; अशी चाललीय खरेदीची लगबग

सर्व भाविकांना चतुर्थीला दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. बऱ्याच भाविकांची लांब पल्ल्यांहून मोरगावात दर्शनासाठी गर्दी लोटते. त्यानंतर शेंदूर पुडा व छबिना कार्यक्रम होतो. पंचमीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर यात्रेचा समारोप होतो. हा सोहळा मोरगावात मोठ्या उत्साहात गावकरी दरवर्षी साजरा करतात. मात्र, यावर्षी कोणत्याही कार्यक्रमांचा आनंद भाविकांना घेता येणार नाही. परंतु, परंपरेनुसार विधीवत सर्व धार्मिक कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मंदार महाराज देव यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhadrapadi yatra not celebrate this year due to corona at chinchwad