Viral Video: भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणतात, 'मै तो भेल पुरी खा रहा था'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

राजकीय व्यक्ती अनेकदा अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमात ठेका धरताना दिसले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि समाजिक संस्थेच्या पुढाकाराने सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

पिंपरी चिंचवड - भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी डान्स केला. त्यांच्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवकही डान्स करताना दिसतात. 

राजकीय व्यक्ती अनेकदा अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमात ठेका धरताना दिसले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि समाजिक संस्थेच्या पुढाकाराने सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार महेश लांडगे या स्पर्धेच्यावेळी उपस्थिती होते. तेव्हा जमलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महेश लांडगे यांनी चक्क झुम्बा डान्स केला. 

आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न मार्गी

रविवारी सकाळी भोसरी गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी स्पर्धेनंतर पहिल्यांदा झुंबा व नंतर एका फिल्मच्या गाण्यावर नृत्य करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महेश लांडगे यांनी केलेला नृत्यप्रकार फक्त मनोरंजन नव्हे तर झुम्बा डान्स हा एक शारिरीक व्यायाम म्हणून केला.

आणखी वाचा - अजित पवारांनी लक्ष घातलं आणि यंत्रणा घावली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhosari MLA Mahesh Landge zumba dance video viral