अन् तो बहाद्दर म्हणाल, 'तेरा दूध का धंदा जोर से चल रहा है...' 

crime.jpg
crime.jpg

पिंपरी ः "तेरे जेब में कितने पैसे है..उतने निकाल.. तेरा दूध का धंदा जोर से चल रहा है, मुझे पैसे दे'', असे म्हणत दापोडी येथे बेकरी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तरुणाला भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. 

गणेश विष्णू अडागळे (वय 28, रा.गुलाबनगर, नदीपात्राजवळ, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी फराहीन तवारफ शेख (वय 52, रा.गुलाबनगर, दापोडी) यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील जयभीमनगर येथील शिवशक्ती स्पोर्टस्‌ समोर मंगळवारी सकाळी 6 वाजता वरील प्रकार घडला. शेख आणि त्यांचा सोळा वर्षीय मुलगा दानेश हे दोघे दूधगाडीतून दूध घेण्यासाठी दापोडी रेल्वे फाटकाकडे चालत जात असताना आरोपी अडागळे याने दोघांना चाकूचा धाक दाखविला. तसेच मुलाच्या पॅंटच्या खिशामधून हात घालून 2 हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com