तिने अनेकांचा लॉकडाउन सुसह्य केला; गरिबांच्या प्रवासात सोबती झाली...ती म्हणजे...

सुवर्णा नवले
Monday, 18 May 2020

लॉकडाउनच्या काळात वाहनांमध्ये पेट्रोल नव्हतं. काम बंद झाल्याने गोरगरिबांच्या खिशात पैसा नव्हता. अशा वाईट काळात केवळ 'तीच' त्यांच्या कामी आली.

पिंपरी : लॉकडाउनच्या काळात वाहनांमध्ये पेट्रोल नव्हतं. काम बंद झाल्याने गोरगरिबांच्या खिशात पैसा नव्हता. अशा वाईट काळात केवळ 'तीच' त्यांच्या कामी आली. तिनेच काहीशी कामं हलकी केली. तुमच्या सोबत ओझीही वाहून नेली. तिच्यामुळे तुमची पायपीट थांबली. पुन्हा तीच आताच्या लॉकडाउनमध्ये देवदूत ठरलीय. विनामोबदला ती हजारो मैलाचं अंतर तुमच्यासोबत धावतेय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: bicycle and outdoor

तुम्ही बरोबर ओळखलंत. ती दुसरी-तिसरी कुणी नसून ती म्हणजे सायकल. जुनी अडगळीत पडलेली सायकल लॉकडाउनमध्ये आणि नंतरही गोरगरिबांच्या कामाला आली आहे. पगाराचे पैसेही न मिळाल्याने गरजवंतांनी सायकल धुवून-पुसून, हवा भरून एकदम चकाचक केली. तरुणांनाही या कालावधीत सायकल उपयोगी पडल्या. बऱ्याच कुटुंबीयांची किराणा, भाजीपाला, दळणासह छोटी- मोठी कामांसाठी पायपीट होत होती. ती केवळ सायकलमुळे थांबली.

 #VeryPositive : दीड महिन्याचं बाळ; कावीळनंतर कोरोनाशी लढला अन् जिंकला

लॉकडाउन कालावधीत वाहन चालविताना अथवा पायी चालताना नागरिक दृष्टीस पडले, की पोलिस विचारणा करायचे. तेव्हा बऱ्याच नागरिकांनी सायकलला पिशवी अडकवून घरातील कामे करण्याची शक्कल लढविली. काहींनी अत्यावश्‍यक सेवादेखील सायकलवर पुरविल्या. गरजूंना दोन वेळचे जेवणसुद्धा काही स्वयंसेवकांनी सायकलवर पुरविले. तर बऱ्याच छोट्या व्यावसायिकांनी पिंपरी-चिंचवडमधून शेकडो किलो सामानांची ने-आण सायकलच्या हँडल व कॅरिअरवर केली. हे केवळ सायकलवरून शक्‍य झाले. सध्या नोकरदारांचा खिसा खाली झाल्याने तेही सायकल वापरण्यालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पर्यावरणालाही हातभार लागत आहे.

Image may contain: bicycle

 आयटीयन्सना 'तारीख पे तारीख' मिळण्याचं खरं कारण...

सायकल ठरली 'देवदूत'

आपल्या गावी पोचण्याची आस लागलेल्या परप्रांतीयांनी देखील सायकलवर आठशे ते हजार मैल अंतर कापले. पिंपरीहून थेट कोलकत्याला बाराशे किलोमीटर अंतर सहा जणांनी दहा दिवसांत सायकलवर कापले. तसेच दिल्ली, हरियाना व पंजाब येथूनही मजुरांनी सायकलवर बिहार गाठले. हैदराबाद ते गोरखपूर हे 1800 किलोमीटरचे अंतरही मजुरांनी जुन्या सायकल विकत घेऊन पूर्ण केले. पोट भरण्याची दोन वेळची पंचाईत मजुरांना होती. त्यांच्याकडे केवळ सायकल पंक्‍चरचे साहित्य उपलब्ध होते. त्यामुळे अशा संकटकाळी सायकल त्यांच्यासाठी देवदूतच ठरली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle support to citizens in lockdown