पिंपरी महापालिकेच्या बोपखेल शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, देशातील ही एकमेव शाळा

जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत पिंपरी चिंचवड महापालिका इंग्रजी बोपखेल शाळेचे नाव जाहीर झाले आहे.
English Medium School Bopkhel
English Medium School BopkhelSakal
Summary

जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत पिंपरी चिंचवड महापालिका इंग्रजी बोपखेल शाळेचे नाव जाहीर झाले आहे.

पिंपरी - जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत पिंपरी चिंचवड महापालिका इंग्रजी बोपखेल शाळेचे नाव जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी शाळेने पहिल्या दहात स्थान मिळविले आहे. असा पुरस्कार मिळवणारी देशातील ती पहिलीच एकमेव शाळा ठरणार आहे.

समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल जगभरातील शाळांचा गौरव करण्यासाठी यूकेमधील ‘T4 एज्युकेशन’ या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘USD 250,000 ’आज (ता.९ )जाहीर झाला आहे. जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी विविध श्रेणींमध्ये भारतीय शाळांना टॉप १० शॉर्टलिस्टमध्ये नाव देण्यात आले. महापालिकेच्या प्राथमिक इंग्रजी बोपखेल शाळा गेल्या सहा वर्षापासून आकांक्षा फाऊंडेशन चालवत आहे. या संस्थेचा २५ जणांचा शिक्षकवृंद आहेत. ३१६ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेत झोपटपट्टी, वाड्यांवस्तीमधील ज्युनियर केजीपासून ते इयत्ता सहावीपर्यंत मुलांना शिक्षण दिले जाते. मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्यातील बोपखेल येथील पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल या ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ श्रेणीतील बक्षीसासाठी निवडलेल्या टॉप १० शाळांमध्ये आहेत.

शिक्षण क्षेत्रातील तज्‍ज्ञांचा समावेश असलेल्या ‘पुनरावलोकन पॅनेल’द्वारे जगभरातील शाळांमधील हजारो अर्जांची फेरतपासणी केल्यावर आकांक्षा पिंपरी चिंचवड महापालिका इंग्रजी माध्यम बोपखेल शाळेची निवड करण्यात आली. ‘समुदाय सहयोग’ या श्रेणीअंतर्गत त्यांची निवड झाली. या नामांकनामुळे शाळेत उत्साही वातावरण आहे, अशी माहिती आकांक्षा फाऊडेशनचे समन्वयक निखिक एकबोटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com