ढाक भैरीच्या कड्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

पाऊस थांबतोय तर थंडी पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गात सर्वत्र हिरवळ असल्याने ढाक भैरी सारखा कडा ट्रेकर्सना स्वस्थ बसू देत नाही. नाविन्यपूर्ण व साहसी तरुण मंडळी मोठ्या संख्येने शनिवार व रविवारी हिकडे मनसोक्त फिरायला व ढाकचा थरार अनुभवायला येत आहेत, असे जांभवलीचे ग्रामस्थ राजू कदम सांगत होते.

करंजगाव : नाणे मावळातील ढाक भैरीच्या कड्यावरून भैरवनाथाचे दर्शन घेऊन उतरत असताना तोल गेल्याने पिंपरी चिंचवड येथील प्रचिकेत भगवान काळे खोल दरीत (२००फूट) पडला आणि त्यातच त्याचा अंत झाला. दरम्यान, पुण्यातील दुर्गभ्रमण संस्थेचे अनिकेत बोकील, दीपक पवार हे कळकराय येथे ट्रेकिंग करत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ते दरीत उतरून मदतीसाठी गेले.

तरुणाचा मृतदेह दरीतून वर काढत असताना त्यांना लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमची मदत मिळाली. यावेळी अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत मोरे, रसिक काळे, रोहित वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंम्बरे, सतीश मेलगाडे, महेश मसने, गणेश गिद, नेहा गिद, विशाल मोरे, प्रियंका मोरे, नूतन पवार, ब्रिजेश ठाकूर, अनिकेत आंबेकर, सुनिल गायकवाड आदींनी मदत केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

गिर्यारोहकांना खुणावतोय "ढाकचा कडा"
पाऊस थांबतोय तर थंडी पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गात सर्वत्र हिरवळ असल्याने ढाक भैरी सारखा कडा ट्रेकर्सना स्वस्थ बसू देत नाही. नाविन्यपूर्ण व साहसी तरुण मंडळी मोठ्या संख्येने शनिवार व रविवारी हिकडे मनसोक्त फिरायला व ढाकचा थरार अनुभवायला येत आहेत, असे जांभवलीचे ग्रामस्थ राजू कदम सांगत होते.

ढाक भैरी हा सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील मुंबई-पुुणेकरांसाठी सर्वात जवळचा ट्रेक आहे. लोणवळ्याजवळील कामशेत पासून पंधरा किलोमीटर अंतरावर जांभवली हे गाव आहे. तेथूनच तिकडे जाण्यास जंगलातून जाणारी पायवाट आहे. नाणे मावळच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जांभवली गावातून सुमारे दोन किमी जंगलातून गेल्यावर सहयाद्रीच्या डोंगररांगेतील डोंगरात श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर आहे. मंदिरामागेच पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली कुंड आहेत.यातूनच कुंडलिका नदीचा उगम झाला आहे. याकुंडात बाराही महिने पाणी असते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मावळ भागातील हा भाग जणू महाराष्ट्राचे काश्मीरच आहे. मंदिराचा गाभारा हा शिवपूर्व काळातला असून सध्या मात्र मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. ह्यासाठी जांभवली पासुन मंदीरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार केला आहे. मंदिराचा परिसर अत्यंत शांत व नयनरम्य आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरणाचा अनुभव येतो. येथूनच ट्रेकिंगसाठी जगप्रसिद्ध असलेले ढाक भैरवनाथाचे मंदिर (कडा) येथे जाण्याचा मार्ग आहे.

खूशखबर! खूशखबर!! कांदे घ्या...; विक्रीसाठी मोबाईल ट्यून

जांभवलीचे पोलिस पाटील म्हणाले, ''अलीकडच्या चार पाच वर्षांच्या काळात हिकडे येणाऱ्या पर्यटकांची व गिर्यारोहकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील हा 'ट्रेक' असल्याने आधुनिक सोयीसुविधा नसल्या तरीही ग्रामस्थांनी आपल्या परीने सोयी उपलब्ध केल्या आहेत. पावसाळ्यात व हिवाळ्यात संस्मरणीय ठरेल असा निसर्गरम्य परिसर असल्याने गिर्यारोहकांना 'ढाकचा कडा' खुणावतोय…!

 ढाक भैरी/भैरी बद्दल -
 गिर्यारोहक सुनील गराडे, प्रविण गायकवाड सांगत होते, “धक हे किल्ल्याचे नाव आहे आणि भैरी म्हणजे भैरवनाथ. अवघ्या २ तासाच्या जंगलाचा ट्रेक आपल्याला थरारक ढाक भैरी लेण्यांमध्ये घेऊन जातो. या रोमांचकारी ट्रेकचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूला वसलेली गुहा. काही मिनिटे चालण्यामुळे फेरफटका होतो आणि डावीकडे जाताना 'कळकराई'चा उंचवटा दिसतो. उंच कडा आणि डोंगराच्या मध्यभागी अरुंद कडा अरुंद सरळ वाटेत खाली उतरली जिथे आपण दोन गुहेच्या पलीकडे येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकाचा आधार घेऊन येथून पुढे जायला हवे आणि काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. खडकांच्या पॅचवर चढताना जिथे बांबू आणि दोरी गुहेत जाण्यासाठी वापरले पाहिजे. उत्साही तरुणांनी आवश्यक साधनेसोबत घेऊन काळजीपूर्वक ट्रेकिंग करणे अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy dies after falling from Dhak Bahiri