व्याजाने घेतलेले तेवीस लाख दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

व्याजाने घेतलेले तेवीस लाख रूपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही' अशी फिर्यादीला धमकी देत शिवीगाळ केली. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून दरवाजावर लाथा मारत जिवे मारण्याची धमकी दिली.

पिंपरी : व्याजाने घेतलेले तेवीस लाख रूपये दे नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून शिवीगाळ करीत तरूणाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. बावधन येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ईश्‍वर एकनाथ दगडे, सूरज हरिश्‍चंद्र पडवळ, मयूर प्रकाश वेडे (सर्व रा. बावधन) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्‍वास कैलास दगडे (रा. बकाजी कॉर्नर, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून शनिवारी (ता.12) रात्री अकराच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या घरात शिरले.

Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत
 

"व्याजाने घेतलेले तेवीस लाख रूपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही' अशी फिर्यादीला धमकी देत शिवीगाळ केली. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून दरवाजावर लाथा मारत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy was beaten and Threaten kill him for demanding to Return money given on interest

Tags
टॉपिकस
Topic Tags: