पिंपरी : उपेक्षित समूहाला मुख्य प्रवाहात आणा - प्रणिती शिंदे

एससी कल्याण समिती प्रमुख प्रणिती शिंदे यांची अपेक्षा
Bring the Neglected SC Group into Mainstream Praniti Shinde pimpri
Bring the Neglected SC Group into Mainstream Praniti Shinde pimprigoogle

पिंपरी : राज्य सरकारच्या अनुसूचित जाती (एससी) कल्याण समितीने गुरुवारी महापालिकेस भेट देऊन एससीविषयी विविध कामकाजाचा आढावा घेतला. उपेक्षित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी मनापासून सकारात्मक काम करावे, अशी अपेक्षा समिती प्रमुख प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. समिती सदस्य आमदार यशवंत माने, लहू कानडे, राजेश राठोड, लखन मलिक, अरुण लाड, सुनील कांबळे आणि टेकचंद सावरकर, अतिरिक्त सचिव सीमा तांबे, कक्ष अधिकारी पवन म्हात्रे आदी शिंदे यांच्या समवेत होते.‌ त्यांनी अनुसूचित जाती कर्मचारी भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, मागासवर्गीयांसबंधी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली. आयुक्त राजेश पाटील यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.

आढावा बैठकीस समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते. महापालिका राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण योजना आणि उपक्रम यांचे संगणकीय सादरीकरण अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी केले. जिजाऊ क्लिनिक, डाॅग पार्क, ईव्ही चार्जींग स्टेशन, इको वाॅकिंग ट्रॅक, उद्यान, सेवन डी तंत्रज्ञानाने युक्त बालमनोरंजन केंद्र, बर्ड व्हॅली येथील म्युझिक फाऊंडेशन, व्हाॅट्सअॅप चॅटबोट, ओरिसा माॅडेल प्रमाणे आदर्श शाळा विकसित करणे, फुड कोर्ट विकसित करणे, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com