दुरुस्तीसाठी इमारत मालकांना महापालिकेची परवानगी आवश्यक

पिंपरी शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात अधिक धोका असतो. अशा इमारतींत राहणाऱ्यांसह आसपासच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.
PCMC
PCMCSakal
Summary

पिंपरी शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात अधिक धोका असतो. अशा इमारतींत राहणाऱ्यांसह आसपासच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.

पिंपरी - शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात अधिक धोका असतो. अशा इमारतींत राहणाऱ्यांसह आसपासच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. तो टाळण्यासाठी इमारत मालकांनी इमारतींची तपासणी तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घ्यावी व त्यांच्या सूचनांनुसार महापालिकेच्या परवानगीने वेळेत दुरुस्त करून घ्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे.

जुन्या इमारतींची पाहणी करून, त्यांच्या बाबतीत शक्य ती सर्व दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून संबंधितांना नोटिस देण्यात येत आहेत. आपल्या मालकीच्या इमारतींसंबंधी वेळोवेळी पाहणी करून ती इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६५ अन्वये प्रत्येक इमारत मालकाची आहे. या अनुषंगाने एखादी इमारत किंवा तिचा काही भाग, छप्पर, जिना धोक्याचा अथवा मोडकळीस आल्याचे आढळल्यास त्याबाबतची लेखी माहिती नागरिकांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील शहर अभियंता यांच्या कार्यालयात द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अशा इमारतींची पाहणी करून धोका नाहिसा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील एखादी इमारत किंवा तिचा काही भाग आकस्मिकरित्या कोसळल्यास त्याची माहिती महापालिकेला द्यायची आहे.

इमारतीचा एखादा भाग धोकादायक असल्यास तो भाग दुरुस्त करणे शक्य असल्यास इमारतीच्या मालकास दुरुस्तीची नोटीस देण्यात येणार आहे. त्यांनी दुरुस्ती करण्यास असमर्थता दर्शविल्यास व दुरुस्तीचे नकाशे, आवश्यक ती कागदपत्रे दाखल केल्यास भाडेकरूंना दुरुस्तीसाठी परवानगी दिली जाईल. धोकादायक इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत त्यात नागरिकांनी राहू नये. पावसाळ्यात पर्यायी जागेत राहण्याची व्यवस्था करावी. धोकादायक इमारत दुरुस्तीसाठी मालक, भाडेकरूंच्या अर्जाचा प्राधान्याने विचार केला जाईल. याबाबतच्या अडचणींचे निराकरण करून घेण्यासाठी शहर अभियंता यांच्याशी समक्ष संपर्क साधावे. धोकादायक घरे, इमारती दुरुस्तीसाठी परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे अर्ज करावा.

मदत व अग्निशमन केंद्र हेल्पलाइन

  • आपत्ती निवारण - २७४२५५११, १२, १३ आणि ६७३३३३३३

  • मुख्यालय पिंपरी - १०१, २७४२३३३३. २७४२२४०५, ९९२२५०१४७५

  • उपकेंद्र भोसरी - ८६६९६९२१०१, ९९२२५०१४७६

  • उपकेंद्र प्राधिकरण - २७६५२०६६, ९९२२५०१४७७

  • उपकेंद्र रहाटणी - ८६६९६९३१०१, ९९२२५०१४७८

  • उपकेंद्र तळवडे - २७६९०१०१, ९५५२३००१०१

  • उपकेंद्र, चिखली - २७४९४८४९, ८६६९६९४९०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com