शेतात लावलं चक्क गांजाचं झाड; माणमधील प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

शेतात गांजाचे झाड लावल्याचा प्रकार माण येथे उघडकीस आला.

पिंपरी : शेतात गांजाचे झाड लावल्याचा प्रकार माण येथे उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेखर गोपाळ गुंजाळ (वय 55, रा. इशदान सोसायटी, पौड रोड, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. माण-हिंजवडी रस्त्यावरील बोडकेवाडी येथे सुरेश बोडके यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक 431/1 व शेखर गुंजाळ याच्या ताबे वहिवाटीतील शेतजमीनीत गांजाचे झाड लावले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी (ता. 10) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास छापा टाकला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथे सहा फूट तीन उंचीचे 70 हजार 250 रुपये किमतीचे दोन किलो 810 ग्रॅम वजनाचे गांजाचे झाड लावल्याचे आढळले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cannabis plant planted in farm at maan pimpri chinchwad