पिंपरी-चिंचवडकरांनो खबरदार गर्दी कराल तर, आता 'हा' ठेवेल तुमच्यावर नजर

पिंपरी-चिंचवडकरांनो खबरदार गर्दी कराल तर, आता 'हा' ठेवेल तुमच्यावर नजर

पिंपरी : कंटेन्मेंट झोनमध्ये गर्दी करण्यासह मास्क न वापरणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यामार्फतही नजर ठेवली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी सहा कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, रूग्ण आढळणारा परिसर तातडीने कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केला जात आहे. 

सील केलेल्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यासह त्याचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आवाहन केले जात आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कारवाईचा बडगा उगारला जात असून, गांभीर्य नसलेल्या नागरिकांवर पोलिस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासनाने अधिकाधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. या झोनमध्ये ड्रोन कॅमेरे तैनात असून याठिकाणी या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यासह फोटो काढून संबंधित नागरिकावर कारवाई केली जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॅमेऱ्याद्वारे माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक त्याठिकाणी दाखल होत आहे. सध्या आयुक्तालयांतर्गत असलेल्या पंधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. दररोज सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणांवर कारवाई होत आहे. यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या कारवाईचाही समावेश आहे. यामुळे बेफिकीर नागरिकांना जरब बसण्यास मदत होत आहे. यापुढेही अशाप्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com