जुनी सांगवी : पोलिसदादांसोबत केला रक्षाबंधनाचा सण साजरा

जुनी सांगवी : पोलिसदादांसोबत केला रक्षाबंधनाचा सण साजरा

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : कोरोनामुळे सर्वच सण-उत्सवावर बंधने आली आहेत, तर संसर्गाच्या भीतीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व नातेवाइकांकडे येणे-जाणे देखील बंद आहे. मात्र, लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व प्रशासनातील इतर कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही, अशा पोलिस बांधवांना आदिकल्प महिला बचत गटातर्फे राखी बांधून सण साजरा केला. 

पोलिस बांधवांना कोरोनामुळे रस्त्यावर उतरून अहोरात्र काम करावे लागत आहे. घरापासून दूर कर्तव्य बजावताना रक्षाबंधन हा जिव्हाळ्याचा सणही बहिणीकडे जाऊन साजरा करता येत नाही. 'आधी कर्तव्य, मग सण-उत्सव', ही भावना जपत पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात चौक, रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवला. सांगवी पोलिस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना येथील आदिकल्प महिला बचत गटाच्या वतीने राखी बांधून सण साजरा केला. यामुळे पोलिसही भारावून गेले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील अदिती निकम, सुरेखा भोसले, अर्चना होनंडराव, हेमलता कुंभार, अरुणा नवले या महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. रोहिदास बोऱ्हाडे, राम पवार, राजेंद्र भिसे, कल्याण भोसले, शशिकांत देवकांत, रवि रेगडे, चंद्रकांत भिसे, सोमनाथ असवले, श्रीकृष्ण बनसोडे आदी पोलिस बांधवांना राख्या बांधल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com