दिघीत असा साजरा झाला आदिवासी दिन  

दिघीत असा साजरा झाला आदिवासी दिन  

भोसरी : दिघीतील आदिवासी समाजातर्फे मोजक्या कार्यकर्त्यांनी दिघीतील वाघोबा शिल्प व वृक्षाची पूजा करत जागतिक आदिवासी दिन साजरा केला. तसेच, सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत निसर्ग बचावाबाबत जनजागृती केली. 

सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक वसंत रेंगडे यांनी ‘आपला सण, आपला उत्सव’ ही संकल्पना मांडली. या वेळी रामदास गवारी, आनिल भोजने, संजय बांबळे, कमलाकर मुंढे, रमेश विरणक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नाना तिटकारे, नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या हस्ते वाघोबा शिल्प, वृक्ष आणि आद्यक्रांतिकारक बिरसा मुंढा आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव रढे, माजी नगरसेविका आशा सुपे, राष्ट्रवादीच्या प्रभागाध्यक्षा मनीषा जठर, लक्ष्मण मोहरे, नामदेव उतळे, शिवाजी भुंताबरे, बबन पारधी आदींनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोजक्या समाजबांधवांनी दिघीतील वाघोबा शिल्प येथे वाघोबा शिल्पासह वृक्षाची पूजा केली. हा कार्यक्रम फेसबूक लाईव्ह केला होता. यावेळी निसर्गाच्या संरक्षणाबरोबरच कोरोना पसरवू नये, यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ घेण्यात आली. तसेच, उपस्थितांना लाडूचा प्रसाद दिला. दरम्यान, आदिवासी बांधवानी आज घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. त्याचप्रमाणे वारली चित्रकारी असलेल्या साड्या महिलांनी परिधान केल्या होत्या. सणानिमित्त घरोघरी पूरणपोळी करण्यात आल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते रेंगडे म्हणाले, ‘‘आदिवासी विकास मंत्रालयाद्वारे एकूण निधीच्या केवळ एक टक्का रक्कमच आदिवासींच्या विकासावर दरवर्षी खर्च केली जाते. सरकारने मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, त्या आदिवासी समाजापर्यंत न पोचल्याने त्याचा फायदा होत नाही. आदिवासी संघटनांनी या योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचवाव्या.’’ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com